पान:काव्यदोष विवेचन.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[४३] ष्टी बोलत असतां असंगतीविषयी आपण मनांत कांही एक आणिलें नाही. अशा प्रकारचे आपणां दोघांमध्ये आनंद होत असतां, बोलण्यांत व एकमेकांच्या अंगावर तोलण्यात झणजे उडण्या बागडण्यांत रात्र संपून गेली, ती माहित सृद्धां झाली नाहीं; सखे, सीते सांग, हे तुला आठवते काय ? पाहा, आतां हे प्रिय श्रोते जनहो, ह्या नवरा बायकांनी आपल्या खोलीत व पलंगावर केलेल्या गुप्त प्रकारांचा, आप ल्या मुलांमुलींच्या शाळेत प्रवेश व्हावा हो गोष्ठ अति शोचनीय नव्हे काय ? हाय, हाय !! आमच्या देशांतील अनेक सुधारलेले लोक, आमच्या लोकांतील बालविवाहामुळे हळ हळताहेत व आमच्या दयाळू सरकारासही ह्या आमच्या देशांतील बालविवाहाच्या अति शोचनीय स्थितीबद्दल फार वाईट वाटते व सर लेपेल ग्रिफिन सारखे सुधारणुकेच्छु साहेब लोक बालविवाह बंद व्हावा अशाबइल सरकाराने कायदा करावा असें सूचवित हेत, बालविवाहनिषेधक मंडळ्या विद्वज्जन स्थापन करिताहेत, धर्मशारूरीत्या व विशेष करून सायन्सचे जे शास्त्रीय ज्ञान त्या ज्ञानरीत्या बाल विवाह अयोग्य होय, असं सुधारणुकेच्छु जन प्रतिपादिताहेत, हिंदु. स्थान देशांतील प्रजा हा बालविवाहाच्या योगान दिवसानुदिवस अधिकाधिक दुर्बळ होत चालली आहे अशाबद्दल जिकडे तिकडे हाकाहाक होत आहे व दुःखाचे सुस्कार निघत आहेत. सारांश, एतद्दशीय व इंग्रेजी वर्तमानपत्रकर्त, एतद्देशीय व परदेशीय लोक, राजा व प्रजा, सारांश