पान:काव्यदोष विवेचन.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[४२] श्लोक. मालिनीवृत्त. अलसळुलित मार्गी चालतां श्रांत झाली ।। दृढतर परिरंभा देउनी सांवरीली ।। मृदुल कमल तंतूतल्य होतां त्वदंगे ।। पडुनि हृदयिं माझ्या घेतली झोंप संगें ।। ह्मणजे आळसाने लुले झालेले, वाटेंत चालता चालतां थकलेले आणि बळकट आलिंगन देऊन सांवरलेले असे तुझे अवयव मऊ कमलाच्या देठासारखे झाले होते, तेव्हा हे साते, तूं माझ्या हृदयावर पडून संगें झोंप घेतलीस. सीता.- होय, माझी अशी अवस्था झाली होती खरी.. राम.-आणखी-येथे अस घडले की; दिया. एक दिवशी आपण एका शयनी ।। एकमेकांसी करी आलिंगोनी ॥ कांहिं बांहीं बोलतां मंद वचनों ।। अंनि उठले रोमांच थरारोनी ।।१।। एकमेकांसी लावनियां अंगा ।। गाल गालांशी भुजा भुजा संगा।। काढितांही गोष्टिच्या प्रसंगा ।। मनी नाही आणिलें क्रमभंगा ।।२।। असें होतां आनंद उभयतांत ।। रात्र सरली बोलतां तोलतां तें ॥ नाहिं झालें टावकें आपणां ।। काय आठवतें सांग सखे तूतें ॥3॥ ह्मणजे, आपण एके दिवशी एका अंथरुणावर एकमेकांला कंवाळन अथवा पोटाशी धरून इकडच्या तिकडच्या गोष्टी हळू हळू बोलत असतां अंगावर रोमांच थरारोन उठले. आणि आपण एकमेकांच्या अंगाला अंग लावून व तसेच गालांशी गाल लावून आणि हातात हात घालून, कांहों गो