पान:काव्यदोष विवेचन.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१]कोटें सुखाचें स्थल असेल तर प्रीतिवंत बायको व लेंकरें व संसाराला पुरेसा पैका, आरोग्य वगैरे उपयुक्त शास्त्रांचे ज्ञान अमन जर सवीनी सर्व प्रकारे नीतीने वागले तर जे संसार. स्थितीत सुख आहे तसे कोणत्याच स्थितीत नाही. तेव्हां जो कोणी संसारांत सुख मानितो व संसार करितो तो मूर्ख नव्हे, तर लबाड्या, लच्चेगिया, दगलबाजा वगैरे प्रकार संसारांत करावे लागतातच, त्या शिवाय संसार चालणार नाही असें जो समजतो व वागतो तो “मूर्खामाजी परम मूर्ख " आहे असे समजावें. आणि शहाण्यांत शहाणा तो की, जो संसारांत राहून सत्य, न्याय, दया, साधत्व, उद्योग, क्षमाशीलता वगैरे सर्व जे कांहीं सण आहेत ते सोडीत नाही. सारांश सर्व प्रकारें नोतीने चालतो तो, असे समजावें व आमच्या मुलां मुलींचेही असेच समज व्हावेत ह्यांत सवीचे हित आहे व हीच खरी सुधारणा आहे. ह्यावरून कोणा स्त्री पुरुषांची इच्छा ब्रह्मचर्य वृत्तीने राहण्याची आहे तर त्यांना तसे राहूं नये, अवश्य लग्न केलेंच पाहिजे असे कोणी समजू नये. ब्रह्मचर्याचा जर सदुपयोग होतो आहे तर फारच उत्तम गोष्ट आहे. पण जन सोडून अरण्यवास करण्याची जरूरी नाही हे सांगण्याचे तात्पर्य, पुस्तक सहावें. उत्तररामचरित्रांतील. राम आणि सीता यांचा अरण्यांतील चरित्र चित्ररूपाने कोणी लिहिली होती ती पाहून एकमेकांस ह्मणतात. सीता--प्राणनाथा, ह्या स्थळाचे स्मरण तुझांला आहेना? राम-सखे, मी कसा विसरेन बरे? ह्या ठिकाणी असे घडलें: