पान:काव्यदोष विवेचन.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[४०] तर मग ह्यांत पाखंड मत कोणतें व सत्य मत कोणते? तेव्हां अर्थात, ह्याच्या मतानें तो, त्याच्या मताने हा, असें करिता करितां सर्व जगांतील लोक पाखंड मती आहेत असे होईल आणि रामदासाच्या “मर्खाच्या " व्याख्ये प्रमाणे सर्व जगांतील लोक मूर्ख आहेत असें ठरेल. तर याचा योग्य विचार होऊन व्यवस्था व्हावी हे बरें. शेवटी रामदास ह्मणतात की; "मखामाजि परम मूर्ख ।। जो संसारी मानी सुख ॥ संसारदुःखा एवढे दुःख ॥ गणीच ना जो ।। २२ ।।" . herणजे रामदासाने जी मर्याची लक्षणे सांगितली आहेत. त्यांत "शरणागतासि अव्हेरी॥" " उपकाराचा करी अन्पकार ॥" "परपोडेचें मानो सुख॥ पर सुखें मानी दुःख ॥" ." क्रियेवीण सांगे ज्ञान " वगैरे लक्षण सांगितली आहेत त्या सर्वांपेक्षां तो ह्मणतो की, परम मणजे मोठा मर्ख कोणता तर जो संसारांत सुख मानितो आणि त्याच्या एवढे मणजे संसारा एवढे मोठे दुःख कोणतेच नाही, असे जो समजत नाहीं तो. रामदासाने संसार सोडून वनवास पतकरिला होता. तेव्हां त्याने आपल्या मताप्रमाणे हे जे हटले आहे ते साहजिकच आहे. पण आह्मांला जरी आतां साधु,नीतिमंत, लोककल्याणासाठा व जनसुखासाठी झटणारे जन हवे आहेत खरे, तरी पण ते अशा रामदासी जुन्या पद्धतीचे व मताचे नको आहेत. अशा प्रकारच्या उपदेशकांचा काळ मागेच संपला. अहो, जर सुखाच्या संबंधाने विचार केला तर खरें सुख संसाराशिवाय कोच मिळणे नाही. जर