पान:काव्यदोष विवेचन.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३९] सज्ञानपणाचे शिकणे आहे. पुढे असे हटले आहे की: "पाखंड मत स्विकारो ।। तो एक मूर्ख ।। १८ ।।" पाखंड मत ह्मणजे नास्तिक मत (बौद्धपक्षपणादि). ह्मणजे नास्तिकमत स्वीकारणे किंवा बौद्धमत स्वीकारणे हे मूर्खपण काय ? अहो, अमक्या कोणत्या प्रकारची मते कोणाची होणे हे ज्याचा त्याचा जसा विचार, शोध, अवंलोकन, विद्या, तर्क, सहवास वगैरे असतात त्यावर अवलंबून असते. तेव्हां तशी त्याची मतें झाला ह्मणन तो मर्ख काय ? जर कांहों मूर्खत्वाचे असेल तर हे ह्मणणेच आधी मूर्खत्वाचं आहे. बरें दुसरा अर्थ, बौद्धपक्षपणादी झणजे बौद्ध धर्मी होणे हे मूर्खत्वाचे आहे, तर अर्थात जगामध्ये आज एक द्वितीयांश बौद्ध धर्माचे लोक आहेत तेव्हां ते सर्व मूर्ख काय ? काय आश्चर्य हें !!! आणि हे मर्याचे लक्षण ह्मणून आमच्या मलाला शिकवायाचें ? बरें दुसरें असे आहे की, ज्याला त्याला वाटते की माझ्या धर्मा शिवाय जे कोणो दुसऱ्या धर्माचे लोक आहेत ते पाखंडमती होत. तसेच नवीन कांहीं कोणो मत काढले आणि ते सुधारणकीचें, बरे व खरें जरी असले तरी जुन्या लोकांला तें पाखंड मत वाटते. पाहा डार्विनचे मन खिस्तो लोकांला पाखंड मत वाटते; ब्रोडलाचे मत प्रार्थनावादि जनांला पाखंड मत वाटते; येशु बिस्ताचे मत इस्लाएलांना पाखंड मत वाटते; बुद्धाचे मत ब्राह्मण लोकांला पाखंडी वाटते; असा हा प्रकार अनंत गोष्टींत परस्परांच्या संबंधाने चाललेला आहे.