पान:काव्यदोष विवेचन.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - [३८] शकतात तर त्यांत चांगले व व्यवस्थित विचार अवश्य येऊ शकतोल. कवितेत बरे वाईट विचार येणे हे कवींच्या विचारांवर आहे आणि त्यांची निवड करणे आपणांकडे आहे. तेव्हां आपण कवितांची निवड करिते वेळी बऱ्या वाईट विचारांकडे लक्ष दिले पाहिजे. नाहीतर उगाच कविता ह्मणून पुस्तकांत सादर करणे ह्यांत काय फळ ? उलटा अनथे. उदाहरणार्थ, "दोन आणे तीन गणा खास ॥ पांच न सत्रा जाणा चाळीस ॥ पंचवीस आणि शंभर अहेचाळोस ॥ उमजून घ्या मनीं ॥१॥" अशा प्रकारच्या जर ओंव्या करून पुस्तकांत घातल्या तर कसे बरें ? शुद्ध वेडेपणाचे होईल. करितां ज्या कविता सरकारी शाळांतील पस्तकांत घेणे त्या विवेकानें, विचाराने व बरे वाईट जाणून घ्याव्या. पुढे पांचव्या ओवीत असे सांगितले आहे की:.-"न मिळे आलिया पदार्था ॥ तो एक मूर्ख" । ह्मणजे जे काही आपणांकडे येते किंवा कोणी आणितं किंवा देतें तें जो घेत नाहीं तो एक मूर्ख समजावा. आतां पाहा चोरीचा माल आला आणि तो कोणी न घेतला तर तो मूर्ख काय ? आपल्या मुलाला हव्या तशा वाईट मनुष्याची मुलगी सांगून आलो आणि तिला वरिलें नाहीं तर तो मूर्ख काय ? ह्याचा अर्थ तरी काय ? ह्याच अर्थाची एक ह्मण पडलो आहे ती हो की, “ मागायाला आलेल्यास चावें व सांगून आलेले घ्या; नाकारूं नये." ह्या ह्मणीचा लोक बहुत करून मुलगा मुलगी वरण्याच्या बाबतीत फार उपयोग करितात. पण हे अज्ञानपणाचे होय. परंतु आझांला