पान:काव्यदोष विवेचन.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ३७] नाहीत, बायकोची जात आहे" वगैर शुद्ध अडाणीपणाचे विचार हजारों जनांचे आहेत. आणि कदाचित रामदासाचेही असेच असतील तेव्हां त्याने वरप्रमाणे मूर्खाचे लक्षण लिहिले असावें. कोणी जर करितां असा कदाचित अर्थ काढील की, बायकोशी प्रेम धरून आईबापांशी वैर धरणे हे मूर्खाचे लक्षण आहे. ह्यावर मी असें ह्मणतों की, प्रीतोची वाटणी होते किंवा ती विभागली जाते असे नाही. आईबापांवरील प्रेम कमो केल्या शिवाय बायकोवर प्रेम करितां येत नाही, किंवा बायकोवर मेम केले तर आईबापांवर प्रेम करण्याला प्रेमापैकी काही उरत नाही असे काही नाही. जगांत अनेक गोष्टींचा तोटा जरी असला तरी प्रेमाचा तोटा मुळीच नाही. प्रेम जेवढें करावें व जेवढ्यांवर करावे तेवढे आहेच. त्यांत कशाचो खुंट ? खुंट नाही एवढेच नव्हे तर तें जस जसे अधिक करावें तस तसे अधिकाधिक वाढते. तेव्हां बायकोवरील प्रेम वाढण्यांत आणि पितरांवरील कमी होण्यांत कांही संबंध नाही. कोणी याच्यावरही कदाचित् असें ह्मणेल की, या पडल्या कविता तेव्हां शांत जशो कवीची कल्पना धांवेल तशी कविता येते. अमक्याच प्रकारचे विचार त्यांत यणे मटले हणज साधणे नाही. यावर मी असें ह्मणतों की जर कवितांचा असा प्रकार असेल तर मग फार भयंकर गोष्ट आहे. मग जगांतून कविता नाहीतशाच केल्या पाहिजेत. त्या नाशकारक आहत, सुखकारक नाहीत, असें हाटले पाहिजे. पण खरी गोष्ट तशी नाही; जर अज्ञानपणाचे व वेडे विचार कवितांत येऊ