पान:काव्यदोष विवेचन.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३६] आपल्या आईबापांशी वैरभावाने वागणे हे मूर्खाचे एक लक्षण. आणि दुसरे कोणतें तर आपल्या स्वतःच्या बायकोला सखी ह्मणजे प्रिय किंवा प्रिय मैत्रीण मानणे हे मूर्खाचे दुसरे लक्षण आहे. ह्या लक्षणांतून पहिले जे आहे ते योग्य आहे. पण दुसरे अगदी अयोग्य आहे. ही लिहिणारा रामदास, ह्याने संसार सोडून जुन्या प्रकारचे वैराग्य स्वीकारिलें होते व तो बोलून चालून जुन्या मताचा होता, तेव्हां त्याचे असे विचार कां असावेत हाबद्दल फारसे आश्चर्य वाटत नाहा, पण आमच्या सरकाराने असे मत मुलांमुलींस को शिकवावे ह्याबद्दलच फार आश्चर्य वाटते. सुधारलेल्या देशांम. ध्ये स्वतःच्या स्त्रियेस, मित्र व परम जिवलग मानणे हे उत्तम मानले आहे, व हे योग्यच आहे. अज्ञान लोकांत सिला हलकें मानुन ती नवन्याच्या पायांतील वहाण, ती सास सासऱ्याची, नणंदा जावांची बटीक असे मानले जाते. आणि आपल्या लेकास उपदेशहो असतो की, "बाबारे, पायांतील वहाण पायांतच ठेवावो, डोकीवर घेऊ नये. जर एकदां डोकोवर चढली तर फार कठीण जाईल." आणि मुलगा जर आप त्या बायकोसी प्रीतीने वागतो, गोष्टी करितो, तर हे प्रकार अज्ञान सासूला सहन न होऊन तो त्याला ह्मणते "बायको अगदी तुझा जीव झाला,अगदी बावरलास बायको पाहून,आतां डोक्यावर बायकोला घेऊन तरी नाच; तुलाच जशी बायको आहे, दुनियेत दुसऱ्या कोणाला बायका नाहींत वाटतें: बायकोला जग कसे वागवितं ते पाहा, असे लाड कामाचे