पान:काव्यदोष विवेचन.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३५] वाईटाला जर लोक वाईट न ह्मणतील तर जगांत दुर्जनांचा भरणा दिवसानुदिवस अधिकाधिक होऊन जगाची मोठी भयंकर स्थिति होईल. जगाकडे पाहतां तुकारामी उपदेशाप्रमाणे कोणी वागतो असें दिसत नाही. सरकार तरी असे वागतें काय? निदान विद्याखातें तरी असे वागते काय ? विद्याखाते तर वाईटाला वाईट ह्मणतें व चांगल्याला चांगले ह्मणतें एवढेच नाही तर वाईटाला शिक्षा करितें व चांगल्याला इनाम देतें. असें जर आहे तर मग सरकाराने आपल्या प्रजेच्या मुलांला " न ह्मणे कोणासी उत्तम वाईट" तो मनुष्य धन्य अशी व्याख्या कशा करितां व्यर्थ शिकवावी बरें ? असो, आजपर्यंत जे झाले ते झाले. पण या पुढे तरी केवळ डोळेझांक न होतां झा व यासारख्या अनेक गोष्टींचा आमचे दयाळू व विचारी सरकार योग्य विचार करोल आणि आपल्या बाल प्रजेस शुद्ध व सत्य विचारांचे ज्ञानरूपी खाजें देऊन संसारी उत्तम प्रकारें उपयोगी पडण्यासारखी व सुखावह होण्या सारखी त्यांची बु द्धि, कल्पना व विचार होतील अशा प्रकारे तजवीज करील अशी पूर्ण अशा आहे. - मूर्खाची लक्षणे. " जन्मला जयांचे उदरीं । तयांशी जो विरोध करी ।। सखी मानिली अंतुरी ॥ तो एक मूर्ख।। १॥" या ओवीत मुर्खाची दोन लक्षणे सांगितली आहेत. पहिले हे की, ज्यांच्या पोटी आपण जन्म घेतला त्यांशी ह्मणजे