पान:काव्यदोष विवेचन.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३४] पासून अज्ञानपणाचे समज होवोत, किंवा पाहिजे तें होवो. पण मुलांला शिकवायाचे, हे ठीक नाही. तेव्हां तुकारामाचे किंवा कोणाचेही कांही असो, योग्यायोग्य जाणून त्याचा उपयोग करावा हाच उत्तम पक्ष होय. पुढे, तिसऱ्या अभंगांत कोणता मनुष्य धन्य झणजे पुण्यवान् याबद्दल मटले आहे. त्यांत ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यांत "न ह्मणे कोणासी उत्तम वाईट " तो मनुष्य धन्य असे हटले आहे. आपणा कोणांसही हें मत मान्य नसेल. अहो, खरोखर जो कोणी उत्तम आहे त्यास उत्तम न ह्मणणे व जो खरोखरच वाईट आहे त्याला वाईट न ह्मणणे हे मत जर स्वीकारिलें तर जग फारच बिघडून जाईल, लोकांचे गुण दोष ममतेने दाखविणे व चुकीविषयी खात्री करणे, वाईटाला वाईट व चांगल्याला चांगले झणणे, अर्थात वाईटाला योग्य रीतीने दोष देणे व चांगल्याची योग्य रितीने स्तुति करणे वगैरे जे प्रकार आहेत त्यांच्या योगाने जग सुधारण्यास फारच सहाय होतें. वाईटाला लाज उत्प, न्न होते व चांगल्यांस उत्तेजन येते. पण हा तुकारामी उपदेश घेतला असतां चांगला परिणाम न होतां उलटा वाईट परिणाम होईल. तेव्हां मुलांला व सर्व लोकांला असा उपदेश केला पाहिजे की, बऱ्याला बरें व वाईटाला वाईट असें कोगाचीही भीड न बाळगतां योग्य रीतीने ह्मणण्याला, वाईद यकण्याला व बरें स्वीकारण्याला कधी अनमान करूं नये, हे आपले कर्त्तव्य कर्म होय. हाच उपदेश योग्य असून झानेच जगांत सुख व कल्याण होणार आहे, अन्यथा नाही.