पान:काव्यदोष विवेचन.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३३] हणजे दैव, नशीब वगैरे जर केवळ काल्पनिक आहे तर मग सरकाराने शाळांतील पुस्तकांत "अनुकूळ दैव असतां॥ ही आर्या कशा करितां घातली आहे ? हे दैवा संबंधी विचार ह्या आपल्या सुधारलेल्या इंग्रेज सरकारालाही मान्य आहेत. बरे, असे मुलेच ह्मणतात असे नव्हे, तर पोक्त मनष्यही अशाप्रमाणे ह्मणतात. अहो फार तर काय, पण सभेमध्ये उद्योग व देव अशा बद्दल विषय असला मणजे हा आथेचा उपयोग होतां मा ऐकिलें आहे, व आपल्या श्रोतृ जनांपैकीही अनेकांच्या अनुभवास ही गोष्ट आली. असेल. पुस्तक पांचवे. अभंग तुकारामाचे. "सत्य संकल्पाचा दाता भगवान " ह्या अभंगांत " भावबळे फळ इच्छेचें तें" असे लिहिले आहे. ह्याचा अर्थ,—विश्वासाच्या बळाने इच्छिलेले फळ प्राप्त होते, असा झाला. मी ह्मणतों की ह्यांत काही अर्थ नाही आणि अर्थ जर असेल तर तो अनर्थ आहे. असे समजायाचे. विश्वासः झणजे काय आणि विश्वासाने इच्छिलेले फळ प्राप्त होते ह्या झणण्याचा अभिप्राय काय ? कोणत्याही फळप्राप्तीसाठी योग्य प्रकारचे प्रयत्न असले पाहिजेत. विश्वासाने प्राप्तिः होईल ह्मणून समजून राहिले तर माप्ति नव्हे, तर अप्राप्तीच. होणार हे खचित. तेव्हां तुकारामाचा अभंग आहे ह्मणून, हवे ते-मग त्यांत अर्थ असो अगर नसो-हित असो नसो, त्या--