पान:काव्यदोष विवेचन.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३२] आर्या. " अनुकुळ देव असतां न समर्थ करावयास हानि यम ।। होतां ते प्रतिकूळ प्रबळही दुर्बळचि होय हा नियम " ।। ह्यांत दैवाचे महत्व वणिलें आहे. दैव ह्मणजे प्राक्तन, प्रारब्ध, नशीब. हे अनुकूळ ह्मणजे वश्य किंवा आपल्या तर्फेने किंवा सहाय्य असतां साक्षात् यम देखील आपली हानि ह्मणजे तोटा किंवा नाश करण्यास समर्थ होत नाही. पण दैव प्रतिकूळ ह्मणजे विपरीत झाले असतां कोणी मोठा वळवान असला तरी तो निर्बळच होतो, असा नियम आहे. असे प्रकार मुलांनी लहानपणी पाठ केले, गळ्यावर मटले, अन्वयार्थ केला ह्मणजे अर्थात त्या कवितेतील महे त्यांचे सिद्धांत बनून राहतात, आणि राहिलेही आहेत अ अन भवास पटते. आतां ह्या दैववाद्यांचे खोटे सिद्धांत मला च्या कोमल, अशिक्षित व अज्ञान मनावर कां बिंबवावे आमचे सरकार किवा निदान विद्याखातें दैववादी आहे काय, या अशा मतांच्या कविता सरकारी पुस्तकांत असल्याने मुलांचे व दैववादी मनुष्यांचे विचार ही फारच चमत्कारिक होतात. मी आपल्या शाळेतील मुलांला उद्योगाच्या महत्वा बद्दल सांगितले असतां मुले साफ असें ह्मणत की, हवे तेवढे जरी उद्योग केले किंवा न केले तरी दैवांत आहे तेच होईल. तें कधी चकणार नाही. ह्या दैवमताच्या विरुद्ध मी प्रतिपादन केले की ती मुले लागलींच ह्मणत की, असे जर आहे