पान:काव्यदोष विवेचन.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३१] देतात. न समजावून दिले तर मग ही कविता शुद्ध वेडगळपणाची बक बक दिसणार. कारण त्यांत कशाचा कशाला संबंध नाही. पण ह्या श्लोकांत जे आहे ती उत्प्रेक्षा आहे. उत्प्रेक्षा ह्मणून भाषेतील एक अलंकार आहे. दोन पदार्थात कांही गोष्टी सारख्या जेथे आढळतात, तेथे कवि एका पदार्थावर दुसऱ्याचा आरोप करितो झणजे तोच हा पदार्थ आहे असें कवि ह्मणतो त्यास उत्प्रेक्षा अलंकार असें नांव दिले आहे. कोणी पुरुष स्त्रीवियोगामुळे संतप्त होऊन थंड होण्याकरितां चांदण्यांत येऊन बसला, तेव्हां चंद्राकडे पाहून आपल्या स्त्रीचे स्मरण झाल्याबरोबर त्याला काम विकार पहिल्यापेक्षा जास्त होऊन अंगाचा संताप अधिक होऊ लागला, तेव्हां चंद्राकड पाहून वर लिहिल्या प्रमाणे तो ह्मणतो. एवढे सांगून देणे शिक्षकांस भाग पडते व ते सांगतातच. हे प्रकार आमच्या मुलांना ह्या कवितेसाठी समजावून द्यावे लागतात. पण ही कविताच ह्या पुस्तकांतून काढून टाकिली तर कसें ? पुरुषाला स्त्रीभोगाविषयी किंवा स्त्रीला पुरुषभोगाविषयी जी इच्छा होते तो काम, तो चेततो, आणि त्याच्या योगाने जिवाची तळमळ होते, चांदण्यांत बसल्याने कामेच्छा विशेष होते, वगैरे प्रकार आमच्या मुलां मुलींना शिकविण्याची कशारितां तसदी घेतात नकळे.