पान:काव्यदोष विवेचन.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३०] त्यांत विशेष हरकत आहे असे नाही. पण ज्या आख्यानांत कामवासना प्राधान्य आहे किंवा ज्यांत मानुष्य व त्यांत बंधू रक्तप्राशी भीमासारख्या मानवरूपी व्याघ्र प्राण्याचे वर्णन आहे, असली आख्याने अवश्य गाळलीच पाहिजेत आणि त्या बद्दल नीति व नाना प्रकारचे दुसरे उपयुक्त विषयांवर सांप्रतच्या कवीं कडून सोपी आणि तशीच कठीणही काव्य करवावी, ह्मणजे मुलांला सद्गुण व उपयुक्त ज्ञान प्राप्त होऊन कवितेचा अर्थ लावण्याचे सामर्थ्य येण्याला व शब्दांना भरणा होण्याला बरें पडेल, आणि अनर्थकारक परिणामही टळतील. सुभाषित कविता. " संताप दे पास्तव चंद्र नोहे ।। रवी ह्मणावा तरि रात्र आहे ।। हा सागरांतून निघोन गेला || आकाश मांगा वडवाग्नि टेला 71 ह्या श्लोकाचा अर्थ असा की, चांदण्यांत बसून थंड पणा यावा तो न येतां उलटी जिवाची आग किंवा गर्मी होने झास्तव हा चद नव्हे तर सूर्य आहे. बरे, हा सूर्य ह्मणाला तर ही रात्र आहे. रात्रीचा सूर्य कोठचा ? समुद्रांत वडवाग्नि असतो असा काही लोकांचा समज आहे, तो वडवाग्नि समद्रांतून निघून गेला आणि तो आकाशांत जाऊन राहिला. तो हा वडवानीच आकाशांत दिसतो आहे, हा चंद्ग नव्हे. एवढा हा कवितेचा अर्थ झाला. पण ह्यावरून कांहींच समज पडत नाही. ह्मणून ह्याचे इंगित मुलांना मास्तर लोक समजावून