पान:काव्यदोष विवेचन.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२९] प्रमाणे बोलत व हांसत तो भीमसेन, ज्याचे हात व तोंड दुःशासनाच्या रक्ताने भरलेले होते व त्याच्या योगाने तो भयंकर दिसत होता, जणूं काय महा भैरवच प्रकट झाला आहे असा तो, कृष्ण व अर्जुन यांजकडे नाचत गेला. पाहा, आतां ह्या ठिकाणी माझी आज सतत दोन महिने अहिंसा विषयावर व्याख्याने चालली आहेत. व आपण अहिंसेच्या संबंधानें कांही प्रयत्न करितो आहों. पशुवधापासून क्रौर्य व तामस गुण विशेष येतात अशी विलायतेंत व अमेरिकेंत काही लोकांची मते होऊ लागली आहेत व मांसाहार निषेधक मंडळ्या उपस्थित झाल्या आहेत आणि आमच्या सरकारी शाळांत कोणी मनुष्य आपल्या चुलत बंधूचे रक्त पितो असें मनुष्यपणाच्या गुणाला लज्जित करणारे भयंकर वर्णन गळ्यावर गाण्यास मुले शिकताहेत. तेव्हां ह्यास काय ह्मणावें बरें ? असे प्रकार आमच्या सरकारी पस्तकांतून नाहीसे व्हावेत हेच उत्तम होय. ह्मणजे आमच्या कन्या पुत्रांची कोमलांतःकरणे अशा ह्या महत् क्रूर, अयोग्य, विपरीत व अस्वभाविक वर्णनांनी विटाळली जाणार नाहींत. असो; आतां ही दुःशासनवधावरील आपलो टीका परी करण्या पूर्वी इतकें झटले पाहिजे की, आपल्या सरकारी पुस्तकांत जी काही पौराणिक आख्याने आहेत ती विवेकाला खोटी जरी असली तरी ती आख्याने खरी आहेत असा विश्वास धरून ज्या अर्थी मुलांला शिकविली जात नाहीत तर फक्त अर्थ स्पष्टीकरणार्थ शिकविली जातात, त्या अर्थी