पान:काव्यदोष विवेचन.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२८] "ऐसें वदोनि ओष्टप्रांत जिभेने पुनःपुनः चाटी ॥" ह्या आर्येच्या पूर्वीच्या ( १३ व्या) आयत वर्णिल्या प्रमाणे रक्ताची आपल्याला गोडी लागली असें बोलन, तो रक्त पितांना जे रक्त ओंगला लागले होतें तें तो जिभेनें पुनःपुनः चाटून खाऊं लागला.' नंतरः " भीम पुन्हां दुःशासन र अंजलि भरोनियां डोले । मिटक्या देउनि पाहुनि, कर्ण सुयोधन मुखांकडे बोले ॥१८॥ भीभाने दुःशासनाच्या रक्ताने आपली ओंजळी भरून तो मोठ्या दिमाखाने डोलू लागला. आणि त्या ओंजळीतील रक्ताच्या मिटक्या मारून कर्ण व दुर्योधन यांच्या तोंडाकडे पाहून ह्मणाला की, अरेः “ पीतों हे रक्त तुझें हांसत होतासि मज जसा भणगा ॥ दुःशासना तसा तूं पुनरपि गौरौः स्वआनने ह्मण गा" || १९11 अर्थ. अरे दुःशासना, हे पाहा तुझें आतां मी रक्त पितों; अरे जसे एखाद्या भिकाऱ्यास हांसावे, तसा तं मला मागे हांसत होतास. आणि पांडव अनाथ गायरे गाय असें ह्मणून तूं आह्मांस हिणवीत होतास. तर आतां तूंच आपल्या स्वतःला, गायरे गाय मी, असें ह्मणून घे पाहूं. छीः छीः केवढा खुनशीपणा हा !!! शिवाय हे जे एवढे कर्म केलें त्या बद्दल त्याला दुःख वाटले असें नाही; तर तो उलटा, "ऐसे बोलत हांसत शत्रुरुधिर दिग्धपाणिमुख विकट ॥ प्रकट महा भैरवसा नाचत गेला जयाच्युता निकट " ॥ २१ ।। " कुळक्षयमूळा " वगैरे २० च्या आर्यंत वणिल्या