पान:काव्यदोष विवेचन.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ २७ (CG) स्याचे शांत्वन झाले नाही. तर पुढे त्याने काय केले ते हे प्रिय श्रोते जन हो श्रवण करा. पाहा पुढे तर मनुष्याच्या दुष्टत्वाचीच नव्हे तर प्रत्यक्ष राक्षसाच्या दुष्टपणाची सुद्धा कमालच झाली. हाय हाय !! ते प्रकरण सांगण्याला सुद्धा माझें मन घेत नाही. ऐवढे क्रौर्य प्रत्यक्ष वेताळालाही लाजविणारे ते आहे. भीमाने दुःशासनाचा ऊर चिरून, " मग कंठनाळ चर चर, तो सत्य करावया विरुद कापी । देउनि मिटक्या मट मट, घट घट त्या स्वाहितासगुदका पी।।१२।। ह्मणजे, दुःशासनास मारून त्याचे रक्त पिईन अशी जी भीमाची प्रतिज्ञा होती ती खरी करून दाखविण्या करितां भीमाने दुःशासनाच्या मानेचे नर. चर चरां कापिलें आणि त्याने आपला सखा चुलत भाऊ जो दुःशासन त्याचे रक्त मिटक्या मारून मटमटा घटबटां प्राशिलें. अहाहा, केवढी बंधुप्रीति व केवढो कोमलता ! निदान केवढा मनुष्यपणा तरी हा! बरे हे असे करणे त्याला कंटाळवाणे, व ओंगळ वाटले असेंही नाही. एवढा त्याचा खुनशीपणा की तो ह्मणतो: "जे जे लोर्की असती रस त्यांची तों न माधुरो थोडी परि अरिच्या रक्तरसी मज बहु त्यांहनि लागली गोडी ।। १ ।।" जगांत मधुर, आम्ल, खारट, कडु, तुरट, आणि तिखट असे जे षड्स आहेत त्या सर्व रसां पेक्षाही ह्या सख्या चुलत बंधूच्या ( शत्रूच्या ) रक्तांत त्याला अधिक गोडी लागली. होय, एवढी अप्रतिम गोडी त्याला आपल्या चुलत भावाच्या रक्तांत लागली ह्मणूनच त्याने काय केले? तर,