पान:काव्यदोष विवेचन.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२६] एकमेकांच्या अंगावर एकमेंकांचा प्राण घेण्यास धांवले. सारांश ते पिसाळलेल्या जनावरांप्रमाणे एकमेकांवर धांवत गेले आणि एकमेकांस ठार मारण्याकरितां माना त-हेने ताडण करूं लागले. हातां होता, सर शेवटी भीमाने दुःशासनाच्या कपाळावर गदा मारून त्याला जमिनीवर पाडिलें आणि इतक्यानेच त्याच्या खुनशीपणाचा धाया न होता कर्ण, दुर्योधन, कृपाचार्य, कृतवर्मा, अश्वत्थामा वगैरे जे तेथें होते त्या सर्वास भीम मोख्या अभिमानाने व मोठ्या भूषणाने ओरडून ह्मणाला की अहो, मी भोमाने दुःशासनास मारीन अशा बद्दल जी प्रतिज्ञा केली आहे ती, माझे वाडवडील जे स्वर्गात आहेत त्यांस ह्यावेळी संतुष्ट करण्याकरितां खरी करितों, तुमच्या अंगी सामर्थ्य असल्यास त्याचे (दुःशासनाचे ) रक्षण करा. पण कोणी पुढे आला नाही. . मंग भूमीवर अगदी निःशक्त पडलेला जो दुःशासन त्याच्याजवळ भीम मोठ्या वेगाने आला आणि अतिशय बळेकरून त्याने आपल्या पायाने दुःशासनाचा कंठ दडपला आणि मग तरवारीने त्याची छाती चिरली व तीतून भडभडां रक्त वाहू लागले. पाहा हे श्रोते जनहो, हा प्रकरणांत खुनसीपणा, दुष्टत्व, अज्ञानपणा वेडे विचार, पशुत्व वगैरे अयोग्य प्रकारांची कमालच झालो. आणि त्यांत हे प्रकार कोणाच्या संबंधाने, तर सख्या चुलत बंधूच्या संबंधाने. अहाहा ! केवढ सकुमार विचार ! ! त्याचा ऊर विदारून, त्यास ठार मारूनच, त्या पांच पांडवांपैकी जो भीमकर्मा भीम