पान:काव्यदोष विवेचन.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२५] जून तो त्याचा शोध करायाला अरण्यांत गेला. त्याला तेथें मण्याबद्दल सर्व हकिकत समजली. नंतर कृष्ण तो स्यमंतकमणि आणण्या करितां जांबुवंत अस्वलाचें घर में पर्वताच्या खोल दरीत होते तेथे गेला. तेथे त्या जांबुवंत अस्वलाची व कृष्णाची अहोरात्र २८ दिवस झोंबी होऊन शेवटी अस्वल हरला. मग त्या अस्वलाने तो मणी व आपली मुलगी जांबुवंती कृष्णास अर्पण केली ह्मणजे त्याला बायको होण्याकरितां दिली व त्या अस्वलीस कृष्णाने आपली बायको केली. हे झाल्यावर दुसऱ्या दिवशी कृष्णाने सत्राजितास तो मणी परत दिला. मग सत्राजिताने कृतज्ञतापूर्वक आपली मुलगी रुष्णास बायको होण्याला दिली, अशी कथा ह्यांत आहे. तसेंच कुशलवाख्यान, उत्तर गोग्रहण, जरासंध वध, कंसवध, वगैरे जे इतर धर्मातील प्रकरणांप्रमाणे विश्वासाला खरे पण विवेकाला अज्ञानपणाचे व खोटे अशा सर्व प्रकारांतील दुष्टपणा, असंभाव्यता, क्रूरता, विषयासक्ति, वगैरे विषयी जर बोलूं गेलें तर पांच सात व्याख्याने होतील. ह्मणून ते सर्व प्रकार एकाच बाजूस ठेवून फक्त एकाच प्रकरणाविषयों झणजे दुःशासनवधाविषयींच्या ज्या आर्या चौथ्या पुस्तकांत आहेत त्यांतील हकिकत पुढे थोडक्यात सांगून व थोड्या आर्या देऊन हा विषय पुरा करूं. . भीम व दुःशासन हे दोघे सखे चुलत बंधु यांनी एकमेकांस दिलेली दुःखें आठवून, हणजे एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढून रागाने खवळलेल्या उन्मत्त हत्तीप्रमाणे ते