पान:काव्यदोष विवेचन.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२४] होता. तो मोठा मूर्योपासक असे. एके दिवशी त्याने सूर्याची आराधना केल्यावरून प्रत्यक्ष सूर्य त्याजवळ येऊन उभा राहिला. सत्राजिताच्या भक्तिभावेंकरून सूर्य प्रसन्न होत्साता आपल्या सेवकाला वर मागायास सांगितले. त्यावरून सत्राजिताने सूर्याला झटले की, ज्या तुझ्या गळ्यांतील स्यमंतक मण्याच्या योगे करून तुझे प्रखर तेज पडते तो मला द्यावा. त्या प्रमाणे सूर्याने त्यास तो मणी देऊन आपण स्वस्थळी गेला. हा मणी सत्राजित घेऊन द्वारकेस येत असतां नगरांत त्या मण्याचें सूर्या प्रमाणे तेज पडले. हे पाहन लोक घाबरले व कृष्णाला जाऊन हकिकत सांगितली. काही दिवसांनी तो मणी कृष्णाने सत्राजितापाशी मागितला, पण तो त्यास देईना. पुढे एके दिवशी सत्राजिताचा बंध प्रसेन, हा मणी आपल्या गळ्यांत बांधून शिकारीस गेला होता तेथें सिंहाने त्यास ठार मारिलें व तो मणी घेऊन चालला. इतक्यांत त्यास अस्वलांचा राजा जांबुवंत (हा अस्वलच होता) त्याने ठार मारून हा मणी आपल्या घरी नेला आणि आपल्या मुलांला खेळायास दिला. प्रसेन शिकारीहून मुदतीच्या वर फार वेळ गेला तरी अद्याप परत येत नाही तेव्हां आपला शत्रु जो कृष्ण यानेच माझ्या भावास मारिलें असें तो समजला व त्या प्रमाणेच तो लोकांला सांगू लागला. ही वदंता कृष्णाच्या कानावर गेली, त्या वरून कृष्णाला वाटले की, विनाकारण आपली नालस्तो होते तेव्हां स्या मण्याचा शोध लाऊन तो सत्राजितास द्यावा असें यो