पान:काव्यदोष विवेचन.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२३] अभंग तुकारामांचे पात:--" पर दव्य परजाया ।। पाहुन वायां न भुलावें । “परद्रव्य परनारी ।। अभिलाषुनी नाक धरी" || "वंध्ये न होती लेकुरें ॥ काय कीजे त्या भ्रतारें । वगैरे प्रकारची जी वाक्ये ती मुलां मुलींच्या शाळेतील पुस्तकांच्या कवितेत असण्याची काही आवश्यकता नाही. करितां असे प्रकार त्या पुस्तकांतून मुळीच वर्ज करावे. दुःशासनवध. आर्या एकशें एक कौरव आणि पांच पांडव हे सखे चुलत बंधु होते. पण त्यांत नित्य कलह होत असत. आपले प्रस्तुतच्या आर्यत, पांडवांकडील भीम व कौरवांकडील दुःशासन या दोघांमध्ये जे घोर युद्ध झाले तेव्हांच्या प्रसंगाच कवीने वर्णन केले आहे. सरकारी मराठी शाळेतील क्रमिक पुस्तकांतील धेनुहरण ज्यांत, वसिष्ठ ऋषीजवळ एक कामधेनु ( जे जे पदार्थ मागाव ते ते देणारी गाय ) होती तिजपासून मनास वाटतील ते पदार्थ पाहिजेत ते हां वसिष्ठास मिळत, त्या धेनूस कान्यकुब्ज नांवाच्या देशांतील राजा विश्वामित्र बलात्काराने नेऊं लागला, तेव्हां ती धेनु रागावली व तिने आपल्या अंगापासून शबर शक नांवांचे योद्धे उत्पन्न केले. त्यांनी विश्वामित्राच्या सैन्याचा पराभव करून त्यास पळविलें अशी कथा आहे ती, तसंच स्यमंतकोपाख्यान की ज्यांत, द्वारकेमध्ये सत्राजित नामेंकरून एक यादव राहत