पान:काव्यदोष विवेचन.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२२] निमुटपणे सोसून घेतले तर जगामध्ये दुष्ट जन वाढून सज्जनांचा संहार करीतील. मगून असें निमुटपणे सोसणे हे ठीक नव्हे. तर त्यांचे योग्य रीतीने पारिपत्य होऊन त्यांचें तें दुष्टाचरण नाहीसे झाले पाहिजे व ते सुधारले पाहिजेत. असे न करतां देव त्यांस शिक्षा करील असा समज घेऊन बसणे केवळ अज्ञानपणाचें व वेडेपणाचें काम आहे. अशा प्रकारे वस्तुतः व्यवहारांत कोणी वागत नाहीत, असे वागतां येणार नाही, व वागतां आलें तरी तसे वागणे हे ठीक नाही. अमें असतां उगाच अनाचरणीय व निष्फळ प्रकारचे उपदेश मुलांला कशा करितां करावे बरे? दुष्ट व्यसनें. "गांजा ओढुं नको सुरा पिउं नको" ह्या श्लोकाच्या चवथ्या चरणांत असें झटले आहे की “विद्या ज्ञान धना सदा मिळविल्या वांचून राहूं नको" ॥ ह्मणजे विद्या, ज्ञान, व द्रव्य ही नेहमी तूं मिळवीत जा. ती मिळविल्या शिवाय तूं राहूं नको. हा उपर अत्युत्तम व अमोल्य आहे. ह्या विषयी मला एवढेच विचारणे आहे की, जर हा उपदेश खरा आहे तर मग मागें सवय्यांत वर्णन केलेले, ह्या उपदेशाच्या उलट “ अर्थ सुयोग वियोगहि केवळ दुःख अजस्रहि देत असे " " हा वरि अर्थ असोनि अनर्थ असे " वगैरे जे आहे त्याचे प्रयोजन काय?