पान:काव्यदोष विवेचन.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२१] इतकेच ह्मणणे आहे की, ज्याप्रमाणे कोणी संभावित गृहस्थ जेवढ्या मर्यादेनं बोलेल, चालेल, व वागेल, त्याचप्रमाणे स्त्रियांनी वागावें हेंच योग्य होय. सदाचरणाविषयी आर्या. यांतील शेवटोल आर्या अशी आहे की: दिधलें दुःख परानें, उसने फेडूं नये चि सोसावे ।। शिक्षा देय तयाला, करिल ह्मणोनी उगेंच बैसावे " ।। ५ ।। ह्या आयतील उपदेश फार चांगला आहे. कारण आपणांस कोणी दुःख दिले असतां आपणही त्याला उलट दुःख दिले तर दुखापती वाढत जातील व कलह, द्वेष वगैरे दणावत जाऊन जगांत वाईट परिणाम होतील, ह्मणून परतून दःख देऊ नये, असा उपदेश ह्यांत आहे. पण पराने दिलेले दुःख कां सोसावे याचे जे कारण सांगितले आहे ते बरोबर नाही. कारण त्यांत सूड उगविण्याच्या बुद्धिची कल्पना भरून दिली आहे. ते कारण हे की, “देव तयाला शिक्षा करील " असें मनांत आणून आपण स्वस्थ बसावें. ह्मणजे त्याने आपल्याला दुःख दिल्याबद्दल देव त्याचा सूड उगवील ह्मणून आपण स्वतःच सूड उगवू नये, पण जर देव सूड उगविणार नसला तर आपण सोसूं नये, मग आपणही त्याला परत दुःख द्यावे. मग आपण सूड उगवावा. पण सूड उगवायाचा खरा. दुसरा झाच्या संबंधान असा विचार आहे की, जर एकास दुसन्यांनी दुःख दिले व ते सर्व जर त्याने