पान:काव्यदोष विवेचन.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२०] प्रत्यक्ष सर्पाच्या मस्तकावरच ठेविलें आहे की काय, असे जिला वाटते, ह्मणजे जी आपल्या घरा बाहेर जात नाही अर्थात जो पडद्यांतील बायको, ती आणि तसेंच जिचे बोलणे इतकें मर्यादेचें व हळू की, ते लोकांस ऐकू सुद्धां येऊं नये. ते कसे ? तर ज्याप्रमाणे कवडीचुंबक मनुष्याच्या हातन कदापि पैका सुटावयाचा नाही. ह्मणजे "चमडी ज्याव पण दमडी न ज्याव" असा तो मनुष्य असतो, त्या प्रमाणे - तिव्रता स्त्रीचे भाषण दुर्लभ असते, ती खरी पतिव्रता. है लक्षण मोगलाईतील पतिव्रता स्त्रीस कदाचित् शोभत असेल पण खरोखर आह्मांस ह्या एकोणीसाव्या शतकांत व सुधार लेल्या इंग्रज सरकारच्या राज्यांत शोभत नाही. हल्ली आ. पण असे पाहतों की, घरांत बायको कांहीं जोराने बोलली आणि नवरा आपल्या मित्रांबरोबर बसला आहे आणि जर त्याच्या कांनी बायकोचा शब्द आला तर तो धावून बायकोला शिवीगाळ करून ह्मणतो की " रांडे, लाज नाहीं तुला ? घरती आहेस किंवा कसबीण आहेस ? काय कल कल कल कल करितेस ? बाजार बसवी जशी. खोलीच्या बाहेर शब्द जाऊं नये" वगैरे. कोणी कोणी तर बायकांस त्या जोराने बोलल्यामुळे, झोड झोड झोडतात. हे सर्व प्रकार ह्या सवय्यांत वर्णिलेल्या उपदेशासारख्या उपदेशांची फळे होत. आपल्या ह्या देशांतील वडील असेंच मुलांस सांगत आले आहेत. आणि अशा उपदेशाच्या योगाने स्त्रिया गलामांप्रमाणे होऊन राहिल्या आहेत. माझें या संबंधाने