पान:काव्यदोष विवेचन.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१९] गैला असतां स्वस्तिक्षेम वगैरे, ह्मणजे तूं बरा आहेसना ? असेंही कोणी विचारीत नाही. दुसरें, त्याला अंगांत घालण्यास कापडे मिळत नाहीत ह्मणून श्रीमान लोकांजवळ कसे जावे, ते आपला तिटकारा करतोल, ह्मणून तो बिचारा लाजेने त्यांजपासून चार पाउलें दूर दूरच असतो. तो त्यांजवळ येत नाही. आणि ह्या सर्वांच्या योगाने त्याला असे वाटते की, गरिबी जी आहे ती मोठी नरकवासच आहे. हर हर ! अशा गरिबीरूप नरकांत राहणाराच्या जिण्याला ह्मणजे वाचण्याला धिक्कार असो. खचित व्यर्थ त्या बापुड्याचे जिणें !!! पाहा, हे सर्व खरे आहे. आणि ३ या सवय्यीच्या ही ४ थी सवय्यी व हा श्लोक उलट आहे आणि तिचे यांनीं यथास्थित खंडण केले आहे. अशा परस्पर विरुद्ध कविता मुलांला शिकविणे ठीक नाही. तर खऱ्या अर्थाच्या मात्र शिकवाव्या. सारांश, ज्या दोन दारिद्र्या विषयी कविता घेतल्या आहेत त्या ठेवून " अर्थ सुयोगवियोगहि केवळ दुःख अजस्त्रहि देत असे” अशा ह्यांच्या उलट व खोट्या विचारांच्या कविता सरकारी पुस्तकांत असूं नयेत. आतां शेवटल्या सवय्यीकडे बळू. हीत खया पतिव्रता स्त्रीचे लक्षण सांगितले आहे. " जीस गमे पद अन्य गृही जर ठेवियलें जणु सर्प शिरी ।। माक्य जिचे अति दुर्लभ ज्यापरि दुर्मिळ जें धन लोभिकरी ।। झणजे दुसऱ्याच्या घरी पाऊल ठेविलें तर जसे काय