पान:काव्यदोष विवेचन.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१८] सीसुतही अवमानि निरंतर भाषण कोणि मनी नधरी ।। दुःखचि अंतरि बाहिर त्यास महीवरि दुर्गति हीच खरी " ।।४।। ह्यांत सांगितले आहे की, दारिद्र्य जे आहे ते मरणा पेक्षां देखील फार भयंकर आहे. ह्मणजे एक वेळ मरण परवेल पण दरिद्रीपणा पुरवणार नाही. दरिद्री मनष्याचे कसे हाल होतात ते सांगितले आहेत; ते असे की, दरिद्री मनुष्याची लोकांत वजनदारो राहत नाही, दरिद्र्याचा कोणी आप्त असो किंवा परका असो ते त्याचा अपमान करितात. फार तर काय, बायको पुत्र ही देखील त्याचा अपमान करितात, त्याचे बोलणे कोणी मनावर घेत नाही, त्या मनध्यास ( गरिबास ) आंत व बाहेर ह्मणजे मनाने व शरीराने सर्व दुःखच दुःख. मेल्यानंतर पापी जनांस नरकवास आहे असे सांगतात, परंतु दरिद्री मनष्यास दरिद्रीपणा हा जिवंतपणीच ह्या जगांत खरा नरक आहे, एवढा दरिद्रीपणा वाईट आहे. तसेंच, ह्याच पुस्तकांत “सुभाषित कविता" आहेत त्यांत दारिद्याविषयी एक श्लोक आहे की:-- "निद्रव्या पुरुषा न बंधु भजती त्या मान कोठे नसे ।। नाता तो धनिच्या गृहा कुशलही त्याला न कोणी पुसे ॥ थोरां पासुनि दूर दूर फिरतो लाजोनि वस्खाविणें ॥ पाटे निर्धनता महा नरक हा हा धिक तयाचे जिणें "।। १० ।। ह्मणजे ज्या मनुष्याजवळ पैसे नाहीत अर्थात जो गरीब आहे त्याचे भाऊबंदसुद्धा त्याचा सन्मान वगैरे ठेवीत नाहीत व त्याला कोठेच मान नसतो. तो श्रीमंताच्या घरी