पान:काव्यदोष विवेचन.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१७] णाच्या संबंधाने हटले आहे ते पुरे आहे. ह्याच्या संबंधार्ने फक्त एवढेच अधिक ह्मणतो की, द्रव्यप्राप्ति ही दुःखप्रद आहे असें, मोठ्या उदार मनाचे व उदार हस्ताचे धर्मात्मे | जन समजतात काय ? आणि द्रव्य हे दुःख देईल ह्मणून ते आपल्या पासून जावे याकरितां दानधर्म करितात काय ? असें नाही. तर दया वगैरे जे त्यांच्या अंगी सत्व गुण आहेत त्यांच्या योगाने ते द्रव्याचा सढ्यय करितात. तेव्हां धनलोभ्यांला हे (द्रव्यप्राप्ति ही दुःखप्रद आहे असें ) कळत नाही, किंवा द्रव्यप्राप्ति ही दुःखप्रद आहे असे ज्यांला वाटत नाहीं ते धनलोभी, असें ह्मणणे बरोबर नाही. मला तर हा समज अज्ञानमूलक आहे असे खास वाटते. तसेंच द्रव्य हे वर वर अर्थ दिसतो; पण वास्तविक तें अनर्थास कारण आहे, हे मणणेही खरे नाही. द्रव्यामुळे व त्यासाठीच जग चालले आहे. व्याने सुख होते व सर्व काही होते. जर द्रव्य नाही तर जग व्यर्थ आहे. द्रव्य झणजे कसल्या तरी धातूचे नाणे असेंच समजू नये; तर कोणताही पदार्थ की ज्याच्या योगाने जगांत व्यापार उदीम वगैरे नाना प्रकारचे व्यवहार चालतात तें द्रव्य. असो; पुढल्या सवयींत वरोल सवय्यीच्या विपरीत जणूं काय खंडणार्थ लिहिले आहे: " मृत्यपरीसहि निर्धनता अतिदारुण तेज जनांत हरी।। चार जो निज का परकीयहि पाहुनि निर्धन तो अपमान करी।।