पान:काव्यदोष विवेचन.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रयोजन नाही, हे सांगणे नको. तिसऱ्या ओळींत सांगितले आहे की, आपल्याला द्रव्य प्राप्त झाले तरी किंवा ते आपणां जवळून गेले तरी नेहमी आपणांस ते दुःखच देणारे आहे. हे खरे काय ? द्रव्य प्राप्ति झाली तर दुःख कसचें? खरोखर द्रव्य हे सुखकारक आहे, पण त्याचा सदुपयोग मात्र केला पाहिजे. द्रव्याच्या योगाने दान धर्म करितां येतो. नाना प्रकारें जनांस उपयोगी पडतां येतें, सुधारणा करि. तां येते, दुःखितांचे क्लेश घालवितां येतात, सुखाने राहता येतें, वगैरे नाना प्रकारचे लाभ द्रव्या पासून प्राप्त करिता येतात. आतां कोणी ह्मणेल की द्रव्याचा दुरुपयोग केला असतां तें (द्रव्य ) दुःखप्रद होते. होय, खरेच होतें. पण ह्यावरून द्रव्याचा दोष सिद्ध होत नाही. दुधापासून पुष्टि येते पण ते अति सेवन केल्याने हगवण लागते. ह्मणून दुध प्यालें तरी तोटे व न प्यालें तरी तोटे, असा सिद्धांत ठरवायाचा काय ? जसा दुधाच्या अंगी पृष्टता देण्याचा गुण आहे, तहत् द्रव्याच्या अंगी सुख देण्याचा गण आहे ह्मणून ते सदुद्योगाने सतत मिळवावें वस. कार्टी सतत वेंचावे. चवथ्या चरणांत असे हटले आहे की, असे जरी द्रव्याच्या योगेवियोगें दुःख होतें तरी पण द्रव्य लोभी मनुष्यास हे कळतच नाही की, द्रव्य हे फक्त वरून अर्थ ह्मणजे हित किंवा सुख दिसते, पण वास्तविक पाहतां “ द्रव्य" हे केवळ दुःखच आहे. ह्याजवर हवी तेवढी टीका करतां येईल; पण जे तिसऱ्या चर