पान:काव्यदोष विवेचन.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१५] ठीक आहे. पण परोपकार करण्याचे जे कारण सांगितले आहे ते यथायोग्य नाही. ते कोणतें तर "वैभव शाश्वत नाही" ह्मणून. ह्मणजे, संपत्ति नेहमी राहणारी नाही हणून. मी विचारितों की जर ती नेहमी राहणारी असली तर मम उपकार करण्याची जरूरी नाही काय? ह्मणून हे असें कारण न सांगतां योग्य कारण सांगावें. " अर्थचि या कलिमाजि जना परमार्थ असा दुसरा न दिसे ॥ अर्थ मिळेल कसा मज राहिल तो जवळी मनि हेंचि वसे ।। अर्थ सुयोगवियोगहि केवळ दुःख अजस्र हि देतअसे ।। अर्थपरासि कळेचि नहा वरि अर्थ असोनि अनर्थ असे १ ।।३।। ह्याचा अर्थ असा कीः-ह्या कलियुगांत, लोकांला पैकाच काय तो उत्कृष्ट लाभ आहे आणि दुसरा तसा लाभ नाही असे वाटते. ह्यांत "कलिमाजी" ह्मणजे कलियुगांत असे जे लिहिले आहे ते ठीक नाही. कलियुग मानणें हैं शुद्ध अज्ञानपणाचे व देवभोळेपणाचे लक्षण आहे आणि असे हे देवभोळेपणाचे शब्द सरकारी शाळांतील पुस्तकद्वारें लेकरांला शिकविले जावेत हे ठीक नाही. दुसऱ्या ओळीचा अर्थ की, मला द्रव्य कसे मिळेल व मिळालेले द्रव्य मजजवळ कसे राहील, ह्याविषयींच मनांत विचार येतात. मी ह्मणतो की, आपणांला कोणत्या सदुद्योगानें पैका मिळेल व तो दुर्व्यसनांत न जातां आपणांजवळ राहून त्याचा कोणत्या रीतीने सदुपयोग होईल असे विचार मनांत असलेच पाहिजेत. असे विचार असण्या करितां द्रव्यलोभी होऊन बसण्याचे