पान:काव्यदोष विवेचन.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१४] णे हे योग्य नाही. तर शिकायाच्या वेळी खेळू नये, तसेच दुखापत होणारे, अनीतिप्रवर्तक किंवा कोणत्याही प्रकारे अयोग्य असे खेळ कधीच खेळं नयेत अशा प्रकारचा उपदेश मुलांला करावा. "मुलांनो तुह्मी हा सर्व खेळ सोडा" असा सरसकट बारा टक्के, या प्रमाणे उपदेश करूं नये. चौथे पुस्तक. वसंत ऋतूचें वर्णन, श्लोक. " वृक्षस्कंधी बांधुनी लांब दोले । घेती नारी बैसुनी तेथ झोले ।। ओंव्या गाती स्वप्रियातें बहाती ।। क्रीडायाती लोकलीला पहाती”।।५। अर्थः-झाडांच्या फांद्यांवरून लांब दोरांचे झोपाळे बांधून व त्या झोपाळ्यांवर बसून स्त्रिया झोंके घेताहेत, आणि झोंके घेऊन त्या ओंव्या गाताहेत आणि आपल्या बरोबर क्रीडा करण्यासाठी ( हंसून खेळून मौज करण्यासाठी) त्या आपल्या प्रिय पतीस हाका मारिताहेत आणि जेव्हां ती क्रीडा करितात तेव्हां तो नवरा बायकांच्या गमतीचा हंसण्या बागडण्याचा खेळ इतर लोक पाहताहेत. ____ ह्याच्यावर मी असे विचारितों की ह्या अशा अर्थाच्या कविता मुलां मुलींच्या शाळेत कशाला शिकविल्या पाहिजेत ? नवरा, बायको, क्रीडा, लीला वगैरे ह्या गोष्टी मुलां मुली पासून अलिप्त राहूं देणे हे बरें. स्फटसवय्या. "वैभव शाश्वत नाहींच यास्तव काही तरी उपकार करा ॥ ॥ ह्यांत मटले आहे की, लोकांवर उपकार करावे. हैं