पान:काव्यदोष विवेचन.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१३] ६५० वगैरे सर्व मिथ्या आहे; तर त्या सर्वांचा त्याग करून मोक्षसाधनासाठी झटा. अशा प्रकरच्या उपदेशाच्या धरतीवर ह्या वरील आर्येतील उपदेश आहे. पण आपणांस तशा प्रकारचा ह्मणजे संसार त्यागाचा उपदेश नको आहे. तर विद्या करा, उद्योगी व्हा, सत्यता धरा, पवित्राचरण ठेवा, खरेपणाने धन संपादन करा, शरीर निरोगी ठेवा, नाना प्रकारचे उपयुक्त शास्त्रीय ज्ञान संपादन करून घ्या, कलाकौशल्ये शिका, नाना त-हेने उपयुक्त ज्ञान वाढवा, वगैरे उपदेश आह्मांस हवे आहेत. “धन, सुत, दारा, " ह्या आमचा नाश करणाऱ्या आहेत असा घाणेरडा उपदेश आह्मांस नको आहे. तर “सुत, दारा," ह्यांस जर शिकविले पढविले, उद्योगी केलें, सुविचारी, नीतिमंत व प्रीतिवंत केले, व योग्यरीतीने धन संपादन करून योग्य व्यय केला, आणि हा उपदेश प्रत्येक मनुष्य मनी उमजून वागला तर जगांत मोठे सुख होणार आहे; अशा प्रकारचा उपदेश आह्मांस हवा आहे व हाच योग्य आहे. धडा ६८ वा, मुलांस उपदेश. श्लोक. “मुलांनो तुझी सर्व हा खेळ सोडा ।। मनी काळजी बाळगा ज्ञान जोडा ॥ ह्यांत मुलांला सर्व खेळ टाकून देण्या विषयी उपदेश आहे, हे ठीक नव्हे. खेळ मुलांस अवश्य असलाच पाहिजे. सर्व वेळ विद्येत घालवायाचा नाही. ह्मणूनच शाळांला अनेक सुट्या असतात. सर्व खेळ सोडून द्या असा उपदेश कर