पान:काव्यदोष विवेचन.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१२] संबंधाने मला एवढेच ह्मणणे आहे की “दैव " " नशीब" वगैरे खोट्या कल्पनेचे, देवभोळेपणाचे शब्द सरकारी पुस्तकांत असूं नयेत. दैवांत असेल ते होईल, नशिबांत असेल तर मिळेल, वगैरे प्रकार केवळ अज्ञानपणाचे व देवभोळेपणाचे आहेत. आणि त्या विचारांस सरकारी पुस्तकांत आश्रय मिळावा ही मोठी खेदकारक गोष्ट होय. पुढे द्रव्या बद्दल गर्व कां बाळगू नये ह्याचे कारण सांगितले आहे की, ते क्षणांत नाहींसें होईल. ह्यावर मी असें ह्मणतों की, द्रव्य बराच वेळ टिकण्या सारखे असले तर मग अभिमान बाळगिल्यास हरकत नाही काय ? मला वाटते की, गर्व न बाळगण्याचे ह्या पेक्षा अधिक चांगले व सबल प्रमाण सांगणे हे बरें. पुढें: “हित भजन ईश्वराचें, धनमुतदारादि दिसति मात्र हित।। परि परिणामी दुःखप्रद मग त्यां का ह्मणूं नये अहित" ||४|| अर्थः- ईश्वराचे भजन करणे हेच आपलें सुख. पैका, मुलगा, बायको ह्यांपासून आपल्याला सुख आहे असे वाटते; पण ही शेवटी आपणांस दुःख देणारी आहेत. असें असतां आपण त्यांस (धन, पुत्र व स्त्री यांस ) आपले अकल्याण करणारी आहेत असें कां ह्मणूं नये ? ह्याच्या संबंधाने एवढेच झटले तर पुरे की, हिंदुस्थानांत झालेल्या साधु जनांपैकी बऱ्याच साधूंचा लोकांला असा उपदेश आहे की जग मिथ्या आहे, धन, सुत, दारा, भाऊबंद, माया, ममता, प्रीति, प्रेम, ऐहिक सुखासाठी झटणे