पान:काव्यदोष विवेचन.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[११] " विद्याहीन नराला, इह पर लोकींहि गति नसे बरबी || ह्मणजे जो मनुष्य विद्या शिकला नाही त्याला ह्या मृत्युलोकीं व स्वर्गलोकीही चांगली गती प्राप्त होत नाही. लोकांनी आपल्या धर्मात येऊन मिळावे हा ज्या त्या धर्मी लोकांचा हेतु साध्य व्हावा याकरितां नाना प्रकारचे | धर्मी लोक नरका स्वर्गाच्या गोष्टी लोकांस सांगतात. तद्वत् हे विद्याखाते, लोकांनी विद्या शिकावी हा हेतु सिद्धीस नेण्याकरितां यानेही परलोक हाती घेतला आहे की काय, असा ह्यावरून भास होतो. अहो, जी मनुष्ये विद्या शिकली नाहीत किंवा शिकत नाहीत ती मेल्यावर नरकांत जातील काय? आणि जो विद्या शिकतात ती स्वर्गात जातील काय ? ह्या अशा गप्पा व भुलथापा देणे हे अगदी गैरशिस्त काम आहे. वियेपासून खरेखुरे जे लाभ आहेत व ती नसल्याने खरोखर जे तोटे आहेत ते दाखवून लोकांस विद्येची गोडी लावावी. धडा ४२ वा. नीतिपर कविता. आर्या. " देवें दव्य मिळाले, जरि तरि चित्तीं धरूं नये गर्व ।। त्याचा काय भरंवसा, जाइल बापा क्षणांत तें सर्व" ।। १।। अर्थः-आपण नशिबाने पैसेवाले जरी झालों तरी मनांत अभिमान बाळगू नये. कारण बापा, धन आपणां जवळ राहिल अशाचा भरंवसा कोठे आहे ? कदाचित् ते सर्व एका क्षणांतही नाहीसे होऊन आपण दरिद्री होऊ. ह्याच्या