पान:काव्यदोष विवेचन.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१०] आपल्या दुसऱ्या खात्यांत ( न्याय खात्यांत ) जामीन घे. ण्याबद्दल कायद्यांत कलम घालतें व लोकांचे जामीन मागून व घेऊन व्यवहार चालविते. आतां ह्या प्रकारास ह्मणावें तरी काय ? एका ठिकाणी नियम करावा की चोरी करूं नये व दुसऱ्या ठिकाणी नियम करावा की चोरीचा माल घ्यावा व तो घेणे अशा काही प्रकारचे हे आहे. तेव्हां है वाक्य सरकारी पुस्तकांत नसले पाहिजे. जर असेल तर त्यांत कांही सुधारणा करावी. धडा ३३ वा, विद्येची प्रशंसा. आर्या. ह्या कवितेत ज्या काही अयोग्य आर्या आहेत त्यांत, " निर्विद्य नराहुन बहु, खर कामा येतसे मनुष्याला ।। खाया काळ भुईला, भार असें निंदितात जन त्याला " |||| ह्मणजे ज्या मनुष्याला विद्या नाही त्या मनुष्यापेक्षा गाढव जो आहे तो मनुष्याला फार उपयोगी पडतो आणि लोक त्या विद्याहीन मनुष्याची निंदा करून असें ह्मणतात की, हा मनुष्य खायाला काळ व भुईला भार असा आहे. हे ह्मणणे खोटें आहे. हे मणणें निरुद्योगी मनुष्याविषयी खरे आहे. पण विद्याहीन मनुष्याविषयी खरे नाही. हवा तेवढा विद्वान असला पण तो निरुद्योगी व फुकट खाऊ असला तर त्याच्या संबंधाने हे खरे आहे, असें ह्मणणे मात्र शोभते. पुढे एका आर्यंत आहे की: