पान:काव्यदोष विवेचन.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चार होतात. एकादी गोष्ट जरी क्षुल्लकशी दिसते, तरी पण तिच्या हयगयी वरून भयंकर परिणाम होतात. मुले मोठी अवलोकन करणारी व धोरणी असतात, येणेकरून दुसऱ्यांच्या आचरणां विषयी ती लागलीच धोरणें बांधितात. ह्मणून फार जपून वागले पाहिजे. एक तर “ अनवाणी चालू नये" हे त्या कवितेतून काढून टाकावें, किंवा मास्तरांला व मुलांला जोडे घालून शाळेत येण्यास भाग पाडावे. असो; पुढें: - "जामिन कोणा होऊ नये" हा जो उपदेश आहे तो फार दुष्टपणाचा आहे. जामीन होणे हे जर आपणांस दुःसाध्य असेल तर किंवा आपण जामीन होण्यापासून अयोग्य परिणाम होणार असेल, दुष्ट, मूर्ख, अविचारी, अनीतिमान, यांचे दुष्टत्व, मूर्खत्व, अविचारीपणा व अनीति वाढणार आहे वगैरे जर काही प्रकार घडण्याचा संभव असेल तर त्यांस जामीन होऊ नये. तसेंच अनोळख्यांस जामीन होऊ नये, वगैरे जामीन होण्याच्या किंवा न होण्याच्या संबंधाने जे कांहीं योग्या योग्य विचार कर्त्तव्य असतील ते करून मोठ्या विचाराने व विवेकानें कोणास जामीन होणे न होणे हे योग्य आहे. पण “जामिन कोणा होऊं नये" असा सिद्धांत ठरवून तो मुलां करवी पाठ करविणे हे मोठे धाडसपणाचे कृत्य आहे. शिवाय असें पहा की, सरकार आपल्या एका खात्यांत ( विद्या खात्यांत ) मलांस शिक. विते की, कोणाला जामीन होऊ नये आणि तेंच सरकार