पान:काव्यदोष विवेचन.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[८] च्या विषयी एवढा घोंटाळा, तोच तूं, मटलें आहे, आपला मार्ग दाखवितोस. केवढें आश्चर्य हें ! व केवढा अद्भुत चमत्कार हा ! ! ! एवढी ही वाटाघाट करण्याचे कारण इतकेंच की, ज्यांत अर्थ नाही व ज्याचा कोठेच पत्ता लागत नाही, अशा शब्दांची एकत्र योजना एकाद्या पद्यांत करून तें व्यर्थ मुलां करवी पाठ करवावे ह्यांत कांहीं फल नाही हे दाखवावें. धडा १७ वा, मुलांस उपदेश. अभंग. ह्यांत "अनवाणी चालू नये" व " जामिन कोणा होऊ नये" असें जें झटले आहे ते ठीक नाही. ह्या देशांतील लोकांनी नाना प्रकारचे समाज वगैरे काढिले व त्यांत ते नाना त-हेची उपदेशपर भाषणे करितात, पण ते बोलणारे लोक आपल्या स्वतःच्या उपदेशाप्रमाणे स्वतःच वागत नाहीत अशी लहान थोरांच्या तोंडीही प्रसिद्धि आहे. तर मी ह्याच्या संबंधाने एवढेच ह्मणतो की, अस न वागण्या बद्दलचा पहिलाच धडा हा उपदेशपर अभंगाच्या द्वारे मुलांस मिळतो. मोठा मधुर स्वर काढून मुलांला गुरु शिकवितो की, “अनवाणी चालूं नये" आणि आपणच स्वतः अनवाणी शाळेत येतो, व मुलेही शाळेत जोडे घातल्या शिवाय येतात. ह्या वरून मुलांला साफ दिसून येते की, अमकें करावें व तमकें करूं नये, अमकें वाईट व तम चांगलें हैं उगाच बोलायाला आहे, तसे वागलेच पाहिजे असे नाही. असे त्यांचे विचार होऊन संवय लागते व तसेच त्यांचे आ