पान:काव्यदोष विवेचन.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[७] झणजे नाश होणे हे शब्द केवळ निरर्थक होत. "उत्प त्ति" या शब्दाचा अर्थ संस्कृत कोशांत असा आढळतो की, "अभावावस्थेत स्थित जो पदार्थ त्याचा भावाव. स्थेत जो संभव ती उत्पत्ति होय." आतां क्षणभर विचार करून पहा की, अभावाच्या अवस्थेत पदार्थ स्थित कसा असणार ? झणजे अभावाची अवस्था ह्मणजे नसणे, ह्यांत स्थित जो पदार्थ, हणजे ह्यांत जो पदार्थ आहे, ह्मणजे नसणे यांत पदार्थ असणे, ह्याचा भावावस्थेत ह्मणजे असण्यांत जो संभव ती उत्पत्ति समजावी. तेव्हां उत्पत्तीची एकंदर व्याख्या काय झाली ती पहा. नणसें ह्यांत पदार्थ असणे ह्याचा असण्यांत जो संभव हास " उत्पत्ति” ह्मणावें. वः केवढे स्पष्टीकरण हें! ! आतां कोणी ह्मणतात की, उत्पत्ति किंवा उत्पन्न करणे हणजे काही नाही त्यांतन उत्पन्न करणे. हा दुसरा गोंधळांत गोंधळ. सारांश काय की, जेवढा जेवढा अंधकार उप. सायास प्रयत्न करावा तेवढा तेवढा तो अधिकच वाढेल. आतां “लय" हा शब्द राहिला, त्याचा अर्थ नाश पावणे, नाहींसें, नष्ट होणे असा आहे. जेवटा सृष्टीच्या संबंधाने उत्पत्तीचा अर्थ निष्पन्न झाला तेवढाच ह्यांतही होणार. तेव्हां उगाच वेळ गमावण्यांत फारसें हांशील नाही. आणखी “आदि अंत ना मध्यही तला" ह्याच्या पुढचा चरण घेतला ह्मणजे मग तर अर्थाची व कल्पनेची कमालच झाली. तो कोणता, तर "तूंच दाविशी मार्ग आपुला.” ज्या