पान:काव्यदोष विवेचन.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एवढेच नव्हे, तर याची मला कल्पना सुद्धा करितां येत नाही. जसजसा ह्याविषयी मी अधिकाधिक विचार करितों तसतशी ह्याची मला अधिकाधिक निरर्थकता मात्र वाटते. मी ह्याचा अर्थ अनेकांला विचारिला; पण कोणी मला स्पष्टरीत्या सांगू शकला नाही. तेच उलटे अधिकाधिक गों. धळांत पडून निरुत्तर व स्तब्ध झाले. त्याला मी विचारिलें की, तुह्मांला ह्याची नुसती कल्पना तरी करितां येते काय ? तर ते त्याचाही जबाब देतनासे झाले. सारांश, हा जबरदस्त गडबडगुंडा आहे ह्यांत संशय नाही. असो; आतां आपण ह्याबद्दल थोडासा विचार करूं. ज्याला आदि नाही, अंत नाही व मध्यही नाही, तो कधी नव्हता असा वेळच नव्हता, तो कधी नसेल असा वेळ असणारच नाही व कधी आहे असा वेळही नाही, असा अर्थ झाला. हणजे त्याला अस्तीत्व नाही असे हटल्याप्रमाणे हे झाले. एका ठिकाणी ह्याचा अर्थ असा सांपडतो की, त्याला उत्पत्ति नाही, स्थिति नाहीं व लय नाही. " स्थिति" शब्दाचा अर्थ राहणे किंवा असणे असा होतो. तेव्हां राहणे किंवा असणे जर नाही तर अस्तित्व नाही असा अर्थ झाला. दुसरा " स्थिति " याचा अर्थ असा निघतो की, जगताची उत्पत्ति झाल्या पासून विनाश होई पर्यंत जी मधली अवस्था ती. आतां केवढा घोंटाळा हा! “जगताची उत्प. त्ति व लय " ! ! अहो जगत् ह्मणजे ब्रह्मांड किंवा सृष्टी, तिच्या संबंधानें उत्पत्ति ह्मणजे ती उत्पन्न होणे व लय