पान:काव्यदोष विवेचन.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

26साई त्यापैकी मुलांचे आईबाप वगैरे कोणी वडील आहेत तर त्यांला मुलांनी अरे तुरे ह्मणावे असा आमच्या मुलांमुलींस सरकार उपदेश करिते व त्यांच्या कोमलांतःकरणांत बिंबवितें असें आह्मीं समजावे काय ? हा उपदेश आह्मांला सर्वथैव अमान्य असावा. जरी दुसऱ्याच्या अंगी उणेपणा असला, दोष असले, नाना प्रकारे ते अज्ञानी असले, । तरी आपण आपले सौजन्य सोडूं नये. कां सोडावें बरें ? आपण सज्ञान ह्मणून काय ? सज्ञान ह्मणून तर अवश्यमेव सौजन्याचे आपण दृढावलंबन केले पाहिजे, असा उपदेश आह्मी आपल्या लेकरांच्या कोमलांतःकरणांत बिंबविला पाहिजे. हा आमा आर्यजनांस मोठा शोभा देणारा गुण आहे. तेव्हां माझी विनंती अशी आहे की, विधेपासून नाना प्रकारचे श्रेष्ठ लाभ आहेत त्यांविषयीं लेंकरांस सांगून त्यांला विद्येची गोडी लावावी, खोट्या रीतीने विद्येचे किंवा कशाचेही महत्व दाखवू नये. पुस्तक तिसरें. श्लोक कामदाछंद. " "आस ही तुझी फार लागली ” ।। ह्या कवनाच्या चवथ्या श्लोकांत परमेश्वराला उद्देशून असे लिहिले आहे की:" नाम रूप हे तूजला नसे ॥ त्या तुला मुखें वर्णवे कसें ।। आदि अंत ना मध्यही तुला ।। तूंच दाविशी मार्ग आपुला ।। ||" हे काय ते खरोखरच मला स्पष्टपणे समजत नाही.