पान:काव्यदोष विवेचन.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[४] पुस्तक दुसरें. श्लोक. " विद्या नसे ज्या पुरुषास कांहीं ।। विचार नीती तिळमात्र नाहीं॥ तया नरा काय अहो ह्मणावें ॥ पशृंमध्ये सत्य तया गणावें ॥१॥ अर्थः-ज्या मनुष्याला विद्या नसते त्याला तिळमात्रही विचार, नीति नसते. त्या नराला "अहो " अशा संज्ञेने बोलावे काय? नाही; तर त्याला “अरे " असें ह्मणावें. आणि खचितच जनावरांमध्ये त्याची गणना करावी, ह्मणजे तो पशुं पैकी एक आहे असे समजावे. आतां ज्या मनुध्यांला विद्या नसते, त्याला विचार व नीति नसते काय ? ज्यांस विद्या नाही अशी मनुष्ये विचारवान व नीतिवान अनेक आढळतात, असे असतां विद्येचे महत्व दाखवायाचे आहे ह्मणून तिची खोटीच प्रशंसा करून अयोग्य रीतीने 'तिजविषयी बोलणे व त्याच प्रमाणे तिच्या अभावा विषयी दोष दाखविणे, आणि निर्दोष्यांस दोष लावणे हैं गैरशिस्त आहे. बरें कदाचित् , ज्या मनुष्यास विद्या नाही, तिळमात्रही विचार नाही व नीति नाही, त्यास "अहो " न ह्मणतां "अरे" असें ह्मणावें व खरोखर तो पशु आहे असे समजावे, असा जरी ह्या श्लोकाचा अर्थ केला, आणि असा कोणी मनुष्य आहे असे जरी घटकाभर कबूल केले तरी त्यास अरे तुरे ह्मणण्यास आपण आपल्या मुलांला उपदेश करावा काय ? कदाचित् कोणी मनुष्य फार अज्ञानी आहे, वेडे आहे, कदाचित्