पान:काव्यदोष विवेचन.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

26साय “ मुके, आंधळे, पांगळे आणि थोटे, " अशांस जर आपण हंसलों तर आपण त्यांच्या सारखेच “ मुके, आंधळे, पांगळे आणि थोटे " होऊ. पण ती मुलें जरी त्यांस हंसली, हणजे त्यांनी त्यांची थट्टा वगैरे केली तरी ती मुलें तशी होत नाहीत असे जेव्हां ती पाहतात तेव्हां त्यांस असे वाटते की, या श्लोकांतील ह्मणणे खोटें आहे. तेव्हां आपण “ मुके, आंधळे, " वगैन्यांस हंसलों तरी हरकत नाही. मुलांस दहशत पड़ावी ह्मणून हवी ती कारणे निकाळजीने सांगितली असता, त्यांच्या अनुभवाला ती गप्पा अशी वाटून मुले अधिक दुर्गुणी होण्याचा मात्र संभव आहे. मुले मोठी अवलोकन करणारी व धोरणी असतात. त्यांच्या अंतःकरणांत दुर्गुणाचा तिटकारा किंवा सद्गुणाची प्रीति उत्पन्न करणे झाल्यास ती यथायोग्यरीत्या, सत्यतेला धरून व स्पष्ट अर्थाने करावी. वडिलांचा हवा तेवढा चांगला उद्देश असून जर तो गूढ असला तर तो त्यांला न कळतां व त्यांच्या मनावर न बिबतां जो स्पष्टार्थ असेल तो (मग तो हवा तसा कां वाईट असेना) त्यांच्या चटदिशी ध्यानांत येऊन तोच त्यांच्या मनावर बिंबतो आणि मग त्याप्रमाणे त्यांचे बरे वाईट आचरण होते. ह्मणून आपण फार जपले पाहिजे.