पान:काव्यदोष विवेचन.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२] ५७ पयें सहाव्या पुस्तकांत घेतली आहेत आणि एकसारखीं १५० पयें आंग्लोव्हाक्युलरच्या तिसऱ्या इयत्तेसाठी नेमिलीं आहेत. ह्या इयत्तांतील कांही कविता अयोग्य प्रकारच्या आहेत व त्या प्रत्येक चढत्या इयत्तेस कशा चढत्या अयोग्य प्रकारच्या आहेत हे आजच्या आपल्या व्याख्यानांत दाखविण्याचा माझा उद्देश आहे. हे दाखविण्याकरिता जेवट्या अयोग्य कविता आहेत असे मला वाटते तेवढ्या सर्व येथे घेतल्या पाहिजे आहेत असे नव्हे; तर त्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत ह्याची कल्पना श्रोतेजनांच्या मनांत येण्याकरितां प्रत्येक पुस्तकांतून थोडथोड्या नमुन्या करितां दाखविल्या ह्मणजे पुरत. विषयाला आरंभ करण्या पूर्वी मला एवढे झटलैं पाहिजे की, ज्या ज्या कविता मो नमुन्याला दाखविणार आहे त्या त्या सर्व मज प्रमाणेच सर्वीस अयोग्य वाटल्याच पाहिजेत किंवा वाटतील असे माझे ह्मणणें नाहीं; कोठकोठे मतभेद पडला तर पडेल. पण एकंदर सर्व कवितांवरून त्या अयोग्य व त्यांस त्या पुस्तकांतून काढून टाकण्याचा विचार करण्यासारिख्या आहेत एवढे आपणांस वाटेल अशी आशा आहे. स पुस्तक पहिले. श्लोक. " मुके आंधळे पांगळे आणि थोटे।। अशा दुर्बळांला करा साह्य मोठे ।। ज़री त्यांस हांसाल होतील तोटे।। तुह्मालाच होता तसें जाल कोठे ।।" ह्यावरून मुलांचा स्वभावतः असा समज होतो की,