पान:कार्यशैली.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

2 २१. सिद्धता त्या एका बैठकीची संपूर्ण सिद्धता होती. संपूर्ण आणि सुयोग्य. वेळ ठरलेली होती. एक दिवस, सकाळी नऊ ते सायंकाळी पाच. बैठकीला कोण येणार ते ठरलेलं होतं. एकूण सोळा माणसं, कोणाचा काय रोल आहे, कोण कशासाठी येत आहे याची प्रत्येकाला सुस्पष्ट कल्पना होती. बैठकीत सर्वांनी मिळून काम करायचं हेही एकदम स्पष्ट ठरलेलं होतं. संध्याकाळी पाच वाजता एका विशिष्ट ठिकाणी पोहोचायचं आहे, म्हणजे एखादी गोष्ट साधायची आहे हे देखील स्पष्ट होतं. हॉलदेखील सिद्ध होता. उत्तम प्रकाश, खेळती हवा, दिवसभर बसता येईल अशा उत्तम खुर्सा, सरळ पण एकदम आरामदायी, प्रत्येकाच्या समोर कागद, पेन, पेन्सिल, पाण्याची व्यवस्था. दिवसभराच्या कार्यक्रमाचा सुवाच्य अक्षरात चार्ट लावलेला. उत्तम शांतता. बैठक घेणाराही सिद्ध होता. बैठकीच्या विषयाचा उत्तम अभ्यास झालेला, भरपूर तयारी केलेली, स्वतः हसतमुख, उत्तम होडी वल्हविणाऱ्या नाविकासारखा, त्यानंही आम्हा सर्वांना पूर्णपणे ओढून घेतलं. सामावून घेतलं, सिद्ध केलं आणि एक सिद्ध बैठक पार पडली. कार्यशैली । ३२