२०. आवाज मनावरचा
सगळा दिवस नेहमीसारखा सुरू झालेला. बऱ्याच दिवसांनी वसंताच्या ऑफिसमध्ये दिवसभर बसून हिशेबाचं काम उरकायचं काढलं होतं.
सकाळी सकाळी खरं म्हणजे कामानं सुरेख गती पकडली, पण तासा-सव्वा तासात डोकं भणभणायला लागलं. चहा घेतला तरी थांबलं नाही, जेवलो, छान जेवलो, तरी डोकं चढतच गेलं. असं डोळे आणि कानांच्या मध्ये खोलवर दुःख, दुपारी नेहमीपेक्षा डबल आणि कडक चहाही प्यालो. पण काहीही उपयोग झाला नाही. शेवटी वैतागून लवकर घरी परतलो.
असं का व्हावं याचं कारण लगेच लक्षात आलं नाही. झोप, व्यायाम उत्तम झालेला, शिवाय
आवडीचं काम म्हणून असं का व्हावं असं वाटत राहिलं.
संध्याकाळी उशिरा डॉ. प्रधान भेटले आणि उलगडा झाला. त्यांनी पूर्ण विचारून घेतलं आणि म्हणाले, 'वसंताच्या ऑफिसजवळच्या गोंगाटाचा त्रास झाला. सतत वेगवेगळे आवाज, हॉर्स, मोठे आवाज कानावर पडले की सहज थकायला होतं.
कामाच्या ठिकाणचा अनावश्यक आवाज कमी करण्याचं तेव्हापासून मी मनावर घेतलंय.
३१ । कार्यशैली