या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सगळं मोडून-तोडून पडेल असे सात-आठ पराभव पाहिले तरी लिंकन बधले नाहीत.प्रत्येक पराभव त्यांना शहाणं करत गेला. शिकवत गेला. पण त्या वादळातून अन् वावटळीतून लिंकन यांनी मार्ग काढला, तो एकाच गोष्टीमुळं स्वत:वरच्या दुर्दम्य विश्वासामुळं.
स्वत:वरचा विश्वास ही कदाचित या जगातली सर्वात प्रबळ अशी ऊर्जाशक्ती असावी. माणसाची कृती, सर्व धडपड, सारे प्रयत्न आणि परिश्रम या सर्वांना ही ऊर्जा लागते, ती निर्माण होते स्वत:च्या दुर्दम्य विश्वासातूनच. आतून, खोलवरून, आपल्या सर्व असण्याला आणि आपल्या सर्व प्रयत्नांना हा दुर्दम्य विश्वासच चेतना देतो, ऊर्जा पुरवतो.
अब्राहम लिंकन यांच्याकडे हा दुर्दम्य विश्वास होता, ज्यानं त्यांना राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान केलं, आपल्याकडं काय आहे? आहे इतका ठाम अजोड आणि दुर्दम्य विश्वास?
कार्यशैली। २२