पान:कार्यशैली.pdf/२२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३. दुर्दम्य विश्वास कधी कधी दु:खाच्या अन् निराशेच्या लाटांवर लाटा येतात. तेव्हा मला अब्राहम लिंकन यांची गोष्ट आठवते. खरं म्हणजे कुठली, त्याच्या जीवनातले निराशेचे एका पाठोपाठ येणारे प्रसंग आठवतात आणि त्या माणसानं त्या सर्व प्रसंगांना किती धैर्यानं तोंड दिलं असेल असं वाटत राहतं.

 पाहा ना, १८३१ साली अब्राहम लिंकन यांनी आपल्या धंद्यात जबरदस्त मार खाल्ला. जबरदस्त. १८३२ मध्ये त्यांच्याकडच्या विधानभवनाच्या निवडणुकीत त्यांनी हार पाहिली. त्याच्या दुसन्याच वर्षी म्हणजे १८३३ मध्ये पुन्हा एकदा धंद्यात नुकसान, मोठं नुकसान पाहावं लागलं. १८३६ साली लिंकन यांची प्रकृती खालावली. १८४३ साली काँग्रेसच्या निवडणुकीत पराभव झाला, १८५५ साली सिनेटच्या निवडणुकीत लिंकन यांचा धुव्वा उडाला. १८५६ साली अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक लिंकन हरले. १८५८ मध्ये सिनेटी निवडणूक पुन्हा एकदा हरले, आणि मग मात्र दोनच वर्षांनी म्हणजे १८६० साली अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून गेले.

२१। कार्यशैली