पान:कार्यशैली.pdf/१२९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९५. एकांत साजरा करू



 एकांत ही महान गोष्ट आहे. एकांत बरं का. एकटेपणा नव्हे.
 एकटेपणा माणसाला विलक्षण त्रास देतो, छळतो, माणसाला खंगवतो अन् हळूहळू नष्ट करू लागतो.मात्र एकांताचं तसं नाही.एकांत माणसाला श्रीमंत करतो,समृद्ध करतो.माणसांच्या प्रचंड गर्दीतही एखादी व्यक्ती एकटी राहू शकते,पण एकांतात माणसाला जगापासून तुटल्यासारखं वाटत नाही.उलट सर्व जगाशी एक प्रकारचं अद्भुत असं नातं माणूस एकांतात निर्माण करू शकतो.

 माणसानं एकांत साजरा करायला हवा.एकांत मिळवण्यासाठी खास आणि विशेष असे प्रयत्न करायला हवेत.तसे प्रयत्न करून एकांत जोपासायला हवा.आपल्याला कुठल्या प्रकारचा एकांत आवडतो ते ओळखायला हवं.माझा मुंबईचा एक मित्र आहे.तो एखाद्या दिवशी एखादं पुस्तक घेतो आणि मुंबईहून निघणाऱ्या पहाटेच्या ट्रेनमध्ये चढतो आणि ए.सी.चेअर कारनं पुण्याला येतो.पुण्याला त्याच्या आवडीचं एक पुस्तकाचं दुकान आहे.तिथे तो एकटाच हिंडतो मग त्याच्या आवडीच्या एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन शांतपणे जेवतो.बरोबर पुस्तक असतंच.संध्याकाळी मग ट्रेननं ए.सी.चेअर कारमध्ये बसून पुन्हा रात्री दादरला.

कार्यशैली। १२८