Jump to content

पान:कार्यशैली.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पुण्याचे एक उद्योजक दर रविवारी गाडी काढून आणि बरोबर ढीगभर वर्तमानपत्रं घेऊन सिंहगडावर जाऊन बसतात.चांगले तीन-चार तास वाचतात.स्वतःला भेटतात आणि आपली बॅटरी चार्ज करून घेऊन पुन्हा पुढच्या आठवड्याच्या कामांना भिडायला सज्ज होतात.एकांताचे वेगवेगळे प्रकार.

 काही जण उत्तम संगीताच्या सान्निध्यात एकांत काढतील तर काहींना निसर्गाच्या सान्निध्यात झाडांच्या सावलीत आणि झुळझुळ वाहणान्या झन्याच्या संगतीत एकांत मिळवावा असं वाटेल.प्रत्येकाच्या एकांताची तन्हा ही वेगळी असू शकेल परंतु प्रत्येकाला एकांताची गरज आहे हे मात्र अगदी नक्की. आपण आपली पद्धत ठरवावी अन् त्या पद्धतीनं एकांत साजरा करावा, एकांत उपभोगावा.सततच्या कृतीच्या गर्दीत, धावपळीत अन् ताणतणावामध्ये अशा एकांतानं विलक्षण हुशारी येते अन् उभारी येते. चित्रं काढावीत, डोंगरदन्यात फिरावं, बागकाम करावं, संगीत ऐकावं, चालावं किंवा सुतारकाम करावं. काहीही करावं पण स्वत:ची अशी एकांताची पद्धत बसवावी.एकांत साजरा करावा अन् मग भेटावं स्वत:ची ओळख करून घ्यावी स्वत:शीच.

१२९। कार्यशैली