८८. तोल जाण्याची सवय
एखादे दिवशी असं होतं की,कुठल्यातरी कारणानं आपला तोल जातो,आणि तो इतका जातो की पुढे बराच वेळ त्याचे परिणाम आपण भोगत राहतो.एखाद्या परममित्राला आपण ज्याला मित्र मानलं तो आपल्याला संपूर्ण दुरावतो.एखादे वेळी जमत आलेली बोलणी फिसकटतात.आपल्या हातून एखादा अपघात घडतो आणि अपरंपार नुकसान होतं.असा तोल जाणं ही गोष्ट फारच वाईट.या तोल जाण्याविषयी एक फार मजेशीर झेन कथा आहे.
काय झालं, एकदा एक माणूस एका झेन गुरूकडे मार्गदर्शनासाठी गेला आणि म्हणाला,"केव्हाही तोल जाण्याची मला सवय आहे."त्यावर त्याला गुरू म्हणाला,"दाखव मग."त्यावर
तो माणूस म्हणाला,"नाही,असं नाही दाखवता येणार.माझ्या नकळत अचानक माझा तोल जातो."बस्स. त्यावर गुरू म्हणाला,"मग तुझी ती सवय नाही.बाहेर काही तरी विपरीत घडतं."
तोल जाणं ही काही अंगभूत गोष्ट नव्हे, त्यावर नियंत्रण मिळवणं व्यवस्थित अभ्यासानं शक्य आहे!