पान:कार्यशैली.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तुम्ही मला विचाराल तर मला वाटतं त्यांची सारी धडपड आनंद मिळविण्यासाठी चालू आहे पण त्यांच्या पुढला तिढा असा आहे की आपण आपला आनंद कशात शोधायचा हेच त्यांना माहीत नाही.इतकंच काय, मला तर कधी कधी वाटतं आनंद म्हणजे काय याचीच त्यांना स्पष्टता नाही.
 आजदेखील असंच झालं. त्याचं हे नवीनच ऐकून मला त्यांची थोडी काळजीच वाटायला लागली.आज त्यांना बऱ्याच गोष्टी समोर दिसताहेत, वेगवेगळी आकर्षणं आहेत.

 त्यातली स्पर्धा आहे. नव्या नव्याचा हव्यास आहे पण आनंद नाही. आनंद म्हणजे काय एवढंच समजावं, हीच माझी एक तीव्र इच्छा आहे.

कार्यशैली। ११६